शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल द्वारे पाठवण्यात आला होता . गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ई-मेल मिळालेला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडालेली होती. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल करण्यात आलेला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे. तपास दरम्यान देऊळगाव मही येथुन दोघांना मुंबई पोलीसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले असून त्यांना घेऊन पोलीस मुंबई कडे रवाना झाले आहेत.
Related Articles
Check Also
Close