विशेष बातमी

*जागतिक मातृदिनी आईला दिली मुलांनी अनोखी भेट,आईच्या हस्ते महिला अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन करून सवडतकर बंधूंनी ठेवला समाजासमोर नवा आदर्श*

*जानेफळ येथे महालक्ष्मी अर्बनचा अनोख्या पद्धतीने झाला उदघाटन सोहळा*

*जागतिक मातृदिनी आईला दिली मुलांनी अनोखी भेट,आईच्या हस्ते महिला अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन करून सवडतकर बंधूंनी ठेवला समाजासमोर नवा आदर्श*

*जानेफळ येथे महालक्ष्मी अर्बनचा अनोख्या पद्धतीने झाला उदघाटन सोहळा*

जानेफळ:- स्थानिक महालक्ष्मी महिला अर्बन पतसंस्थेचे उदघाटन रविवार दि.११मे २०२५ रोजी श्रीमती इंदुबाई सवडतकर यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरात विविध सामाजिक व विधायक उपक्रमात येथील गणेश सवडतकर व विनोद सवडतकर हे बंधू नेहमीच अग्रस्थानी असतात.आपल्या अश्विनी इलेक्ट्रिकल्स च्या माध्यमातून तथा गणेश सवडतकर यांच्या स्वच्छ व पारदर्शी पत्रकारितेच्या माध्यमातून ह्या बंधूनी जानेफळ पंचक्रोशीत एक विश्वासाचं नातं तयार करून प्रचंड मोठा जिव्हाळ्याच्या माणसांचा गोतावळा आपल्या भोवती तयार केला आहे. आणि आता याच भावंडांनी सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. महालक्ष्मी अर्बनच्या माध्यमातून जानेफळ व परिसरातील सामान्य लोकांना दर्जेदार व गतीशील सेवा देण्याच्या उद्देशाने आपण या क्षेत्रात उडी घेतल्याचे या दोघे बंधूंनी सांगीतले आहे. सदर उदघाटन सोहळा अगदी प्रवाहाच्या बाहेर जात आपल्या पतसंस्थेच्या उदघाटनाचा मान त्यांनी आपल्या आईला देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आपल्यासाठी खरं दैवत आणि आदर्श हे आपले आई वडीलच असतात असा जणू सामाजिक संदेशच त्यांनी या माध्यमातून दिला आहे. आणि या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची चर्चा सुध्दा होत आहे. फीत कापून पतसंस्थेचे उदघाटन करीत असतांना त्यांच्या आई श्रीमती इंदुबाई सवडतकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आपल्या दोन लेकांच्या प्रगतीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. याप्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री खासदार प्रतापरावजी जाधव,माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, डॉक्टर, पत्रकार बांधव, विविध क्षेत्रातील अधिकारी, सर्व बँक कर्मचारी तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.एक सामाजिक आश्वासक हक्काचं ठिकाण म्हणून महालक्ष्मी महिला अर्बन पतसंस्था अल्पावधीतच नावारूपास येईल अशा सदिच्छा मान्यवरांनी दिल्या.विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती होती.सदिच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला रुमाल व टोपी देऊन सन्मानित करण्यात आले. या निमित्तानं महालक्ष्मी अर्बन परिवाराचा उदघाटन सोहळा सर्वांनाच भुरळ घालणारा ठरला.

 *उद्घाटनाच्या शुभमुहूर्तावर महालक्ष्मी महिला अर्बन पतसंस्थेला खातेदारांचा प्रचंड प्रतिसाद,५५ लक्ष रुपयांच्या मिळाल्या ठेवी*

उद्घाटनाच्या शुभमुहूर्तावर खातेदारांनी महालक्ष्मी महिला अर्बन पतसंस्थेवर विश्वास दाखवीत तब्बल ५५ लक्ष रुपयांच्या ठेवी आमच्याकडे दिल्याने आम्ही त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच येणाऱ्या काळात सुद्धा खातेदारांच्या विश्वासाला साजेशे काम करू व भविष्यात चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे काम आमची पतसंस्था करेल अशा प्रकारची ग्वाही देतो तसेच संचालक मंडळ, सल्लागार समिती व सर्व संस्थेचे कर्मचारी यांच्या सहकार्याने व मेहनतीने आम्ही हे सर्व शक्य करू शकलो आणि येणाऱ्या काळात सर्व सामान्यांसाठी आपली पतसंस्था काम करेल अशी ग्वाही देतो

गणेश नागोराव सवडतकर

संस्थापक अध्यक्ष

महालक्ष्मी महिला अर्बन पतसंस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: