*भेंडवळच्या मांडणीची भविष्य वाणी*
*🌧️🌧️पाऊस चांगला बरसणार मात्र पीके साधारण असणार;* * ऑगस्टमध्ये राज्यात नुकसान करणारा पाऊस;*

यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचे संकट असेल. देशाचा राजा कायम राहील
🔴🔴 *भेंडवळच्या मांडणीची भविष्य वाणी* 🔴🔴
*🌧️🌧️पाऊस चांगला बरसणार मात्र पीके साधारण असणार;*
* ऑगस्टमध्ये राज्यात नुकसान करणारा पाऊस;*
*बुलडाणा:- पाऊस व पीक पाणी तसेच इतर घडामोडी विषयी अंदाज वर्तविणारी तसेच गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी वर्ग विश्वास ठेवत असलेली शेतकरी व राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतिक्षित असणारी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावची भेंडवळची मांडणी काल बुधवारी संपन्न झाली. भेंडवळच्या घट मांडणीत शेतीविषयक, राजकीय परिस्थिती, देशाची आर्थिक स्थिती, देशाची संरक्षण स्थिती याविषयी वर्षभराचे अंदाज वर्तविण्यात येत असतात. आज दि.१मे गुरूवार रोजी सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचे संकट असेल. देशाचा राजा कायम राहील अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.*
* 370 वर्षांपासूनची स्थानिक भेंडवळच्या मांडणी ही परंपरा आहे. जवळपास जिल्हाभरातील बहुतांश शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करीत असतात. यावर्षी भेंडवळच्या मांडणीत अनेक अंदाज वर्तविण्यात आले आहेत. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. हे फक्त अंदाज आहेत. घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणी विषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत असते. घटमांडणी नंतर वर्तविलेले अंदाज पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत.*
*अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे.शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.*