विशेष बातमी

पाठीवरील कौतुकाची थाप विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह वाढवते – ठाणेदार अजिनाथ मोरे 

अंबिका महिला अर्बनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार 

पाठीवरील कौतुकाची थाप विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह वाढवते – ठाणेदार अजिनाथ मोरे

अंबिका महिला अर्बनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार 

जानेफळ:- विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे होणारे कौतुक आणि आणि त्याच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप हे विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढविते आणि त्याला आणखी यशाच्या शिखरावर नेण्यास प्रवृत्त करते त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव निश्चितच प्रगतीकडे नेईल असा विश्वास येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी व्यक्त केला आहे.

आज शुक्रवार दि.१६ मे रोजी स्थानिक अंबिका महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रूपालीताई वडणकर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अजिनाथ मोरे, संतोष तोंडे, जुगल किशोर राठी, मुख्याध्यापक गजानन गवई, गजानन भगत, डॉ. प्रवीण देशमुख, मुख्याध्यापिका मीनल जोहरे, आदर्श शिक्षिका सुरेखा जावळे गुजरे, सौ.योगिता देशमुख,सौ.दिपाली राजुरकर,अनिता शिंदे, डॉ.दीपक गवई, अशोक निकस, संतोष सवडतकर, प्रा.संदीप काळे,प्रा. समाधान कृपाळ,प्रा. अमोल गायकवाड, आसिफ मिर्झा,संतोष गवई, प्रमोद सोनपसारे,पत्रकार मनिष मांडवगडे, गणेश सवडतकर,सागर गव्हाड आदि उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचा अंबिका महिला अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मोहन धोटे पाटील, अध्यक्षा सौ.मंगला मोहन धोटे, उपाध्यक्ष जगदीश मोहरूत,मा.सरपंच किशोर गव्हाड,लोकमत ता. प्र. अमर राऊत,अमोल धोटे, विशाल धोटे, शिवसेना शहर प्रमुख सचिन राजूरकर,अनिरुद्ध हिवरकर, व्यवस्थापक प्रवीण बार्डेकर, पत्रकार विशाल फितवे, आकाश सवडतकर, निलेश लाड, गोपाल चांदणे यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तद्नंतर श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जानेफळ, जिजामाता विद्यालय हिवरा खुर्द, प्रा. एन.डी.पाटील विद्यालय हिवरा खुर्द, श्री शिवाजी विद्यालय जानेफळ, सहकार विद्या मंदिर जानेफळ, आ.प.पाटील विद्यालय नायगाव दत्तापूर येथील वर्ग दहावी व बारावी मधील प्रत्येकी दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा भेटवस्तू, प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संचालन डॉ.कृष्णा हावरे यांनी तर आभारप्रदर्शन विश्वासराव सवडतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबिका महिला अर्बनचे व्यवस्थापक प्रवीण बार्डेकर, उमेश राठोड, शुभांगीताई पाटोळे, जितेश काटे, चैताली झगडे, वैभव मोहरुत, सतीश सुरडकर,गोकुळ बुंधे, अमोल बुंधे, सुनील वाघमारे, निलेश धोटे, कार्तिक धोटे यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: