आंदोलन

संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी

 

मेहकर – परभणी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधान शिल्पाची तोडफोड करुन देशद्रोही कृत्य करणाऱ्या दत्ता सोपान पवार या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली व शिष्टमंडळाने पोलीस स्टेशन मेहकर मा.भाऊराव घुगे ठाणेदार पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले. १० डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधान शिल्पाची विटंबना दत्ता सोपान पवार या माथेफिरू इसमाने केल्याची घटना घडली आहे. स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौमत्व हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे. भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृती आहे. या देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत. संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ शिक्षा करावी. परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये. अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

यावेळी,पोलीस स्टेशन मेहकर मा.भाऊराव घुगे ठाणेदार पोलीस निरीक्षक यांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारून आपल्या मागण्या शासनाला कळविल्या जातील असे सांगितले, यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, रवि मिस्कीन कुणाल माने, अख्तर कुरेशी, प्रकाश सुखधाने, नारायण इंगळे,समीर भाई शहा, राधेश्याम खरात, देवानंद आवसरमोल, दिपक गवई, शेख.राजुभाई, शाम कटारे यांच्यासह मेहकर तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: